छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; घडामोडींना वेग; चर्चांना उधाण; भुजबळ मोठा निर्णय घेणार?
1 min read
मुंबई दि.२३:- महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ फारच नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या शर्यतीतून आपले नाव बाद झाल्याचे लक्षात येताच छगन भुजबळ यांनी तातडीने सभा, बैठका घेऊन दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यातच नाराज असलेले छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
छगन भुजबळ सकाळी १० च्या सुमारास सागर बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आज सकाळीच ते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
या बैठकीनंतर छगन भुजबळ रवाना झाले. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र अचानक झालेली ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा रंगली होती.
त्यातच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहे. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल झाले.
यावेळी समीर भुजबळ हेही तिथे उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुमारे ४० मिनिटे ही बैठक चालली. छगन भुजबळ हे कुठला वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.