तळीरामांची होणार चांदी, ख्रिसमस, नववर्षानिमित्त ‘इतक्या’ वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट राहणार सुरू
1 min read
पुणे दि.२४:- २५ डिसेंबरला ख्रिसमस आणि त्यानंतर ३१ डिसेंबरला नववर्षाच सेलिब्रेशन असणार आहे. या दोन्ही दिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये गर्दी असते. एरवी नेहमीप्रमाणे ११ किंवा १२ वाजता बंद होणारी हॉटेल मात्र आता नाताळ आणि नववर्षाच स्वागत करण्यासाठी जास्तवेळ सूरू राहणार आहेत.सर्वत्र चर्चेत असलेला Secret Santa गेम नेमका काय ? तो कसा खेळाला जातो. येत्या 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील खाद्यगृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमीट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची विनंती जनरल सेक्रेटरी, इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन यांनी केली होती.
या विनंतीला आता प्रशासनाने हिरवा कंदील दिला असून त्यामुळे आता नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम व ऑकेस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुली राहणार आहे. गृह विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
तसेच 31 डिसेंबर 2024 रोजी गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस चोख बंदोबस्त ठेवणार आहे. तसेच अवैध दारू विक्रीवर चाप बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुक्ल विभागाची पथके तैणात होतील.
रात्रीच्या गस्त, अनधिकृत ढाबे, फार्म हाऊस तसेच संशयित गाड्यांची तपासणी पोलिसांकडून होईल.