केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटवावी:- खासदार निलेश लंके
1 min read
दिल्ली दि.२१:- देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटविण्याची मागणी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल व राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेउन खासदार निलेश लंके यांनी केली आहे.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री पियुषजी गोयल यांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार निलेश लंके समवेत खा.बजरंग सोनवणे, खा.शोभा बच्छाव, खा.राजाभाऊ वाजे, खा.गोवाल पाडवी, खा.वर्षा गायकवाड, खा.भास्कर भगरे, खा.मारूतीराव कोवासे हे सहभागी होते.
मंत्री गोयल यांच्याशी संवाद साधत महाराष्ट्रातील तसेच कांदा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या आपल्या नगर जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटाबाबत चर्चा केली, तातडीने निर्यात शुल्का संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी केली आहे.