प्लॅस्टिक चहाच्या कपावर बंदी घाला; शेतकरी संघटनेची जुन्नर तहसीलदारांकडे मागणी
1 min read
जुन्नर दि.१८:- कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या हार्दिक जपान बंदी घालण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील यांनी जुन्नरचे तहसीलदार डॉ.सुनील शेळके यांच्याकडे केली.कागदी कप बनवताना त्यामध्ये बीपी नामक केमिकल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लॅस्टिक वितळते. आणि चहा घेतल्यानंतर लाखो मायक्रो प्लॅस्टिकचे कण पोटात जातात.
त्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाचा कागदी कापांवर बंदी घालण्यासंदर्भात आपल्याकडून पूर्तता करण्यात यावी. निवेदनाद्वारे शेतकरी संघटने कडून विनंती करण्यात येते की वरील विषयाचे गांभीर्यपूर्वक दखल घेऊन कागदी चहाच्या कपांवर बंदी घालण्यावर प्रशासनाला आपल्या कार्यालयाकडून कळविण्यात यावे.
असे निवेदन जुन्नर तालुका तहसिलदार डॉ.सुनिल शेळके यांना देण्यात आले. निवदेन देते वेळी अखिल भारतीय शेतकरी संघटना युवा अध्यक्ष जुन्नर राहुल जेजूरकर,जेष्ठ शेतकरी गुलाब रोकडे उपस्थित होते.