ताराबाई घंगाळे यांच्या निधनाने राजुरी गावावर शोककळा; रविवारी दशक्रिया

1 min read

राजुरी दि.१७:- राजुरी (ता. जुन्नर) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गं.भा.ताराबाई धोंडीभाऊ घंगाळे यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर राजुरी येथील वैकुंठभूमीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर, स्थानिक ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजुरी येथील शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व राजुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य एम.डी. घंगाळे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक व राजुरीच्या गणेश दूध संस्थेचे उपाध्यक्ष एल.डी. घंगाळे तसेच राजुरी येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सुलभा भास्कर कदम यांच्या त्या मातोश्री होत.

Oplus_131072
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे