रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन मार्फत शालेय इमारतीला रंगकामासाठी ७ लाख रुपयांचे रंग 

1 min read

आळेफाटा दि.१४:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन मार्फत ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, संतवाडी, कोळवाडी संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आळे विद्यालयाच्या विनंतीनुसार शालेय इमारतीला रंगकाम करण्यासाठी साधारण 7 लाख रुपयांचा उत्तम दर्जाचा paint सुपूर्त करण्यात आला.

शाळेच्या इमारतीच्या रांगकमाची सुरुवात शनिवार दि. 14 डिसेंबर रोजी करण्यात आली. शाळेसाठी कलर उपलब्ध करून देण्यास रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेनचे अध्यक्ष प्रा.अमोल कापसे यांनी विशेष प्रयत्न केले.

रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटावून च्या रो मिनल अवचट आणि रो सचिन देशपांडे, रोटरी क्लब ऑफ डेक्कन जिमखाना, पुणे च्या रो. ममता कोलटकर, GDB international चे अतुल कुलकर्णी यांनी GDB Paint & coatings या कंपनीच्या CSR फंडातून paint उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सहकार्य केले.

क्लबच्या सर्व पदाधिकारी, संचालक व सदस्य यांचेही सहकार्य लाभले. सदर रंगकामाचे उद्घाटन क्लबचे मुख्य आधारस्तंभ व यशस्वी व्यवसायिक रो.राजू जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी क्लबचे सदस्य रो.प्रा गोरे, रो. प्रणव काळे,रो.मोहन जाधव, रो.गणेश मेहेर, रो.संपत रहाणे, संगीता जाधव,

प्रिया जाधव तर संस्थेचे खजिनदार अरूण हुलवळे, संचालक जीवन शिंदे, कोते, सूर्यवंशी,अभिजित भुजबळ हे उपस्थित होते.Paint शाळेमध्ये आणण्यासाठी सोमनाथ कुऱ्हाडे व प्रतीक पाडेकर यांनी परिश्रम घेतले.

रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेनच्या या उपक्रमाबद्दल ज्ञानेश्र्वर ग्रामोन्नती मंडळचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, सेक्रेटरी अर्जुन पाडेकर, संचालक बबन सहाणे, भाऊ कुऱ्हाडे, किशोर कुऱ्हाडे, बाबु कुऱ्हाडे, संपत गुंजाळ, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, प्रदीप गुंजाळ, कैलास शेळके, दिनेश सहाणे, उल्हास सहाणे यांनी ऋण व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे