चौदा नंबर येथे घराच्या पकडला अतिविषारी घोणस साप

1 min read

पिंपळवंडी दि.१३:- चौदा नंबर येते सोनवणे सर यांच्या घराजवळ अतिविषारी घोणस साप सोनवणे यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी तात्काळ सर्पमित्र आकाश माळी यांना कल्पना दिली. सर्पमित्र आकाश माळी यांनी येऊन आपला जीव धोक्यात घालून मोठया शिताफीने त्या घोणस विषारी सापाला पकडले. घोणस सापाला पकडून निसर्गाच्या आदिवासात सोडून जीवनदान देण्यात आले. सध्या हिवाळा चालू असल्यामुळे हे साप हिवाळ्यात थंडीत खूप प्रमाणात बाहेर येतात. भक्ष व निवारा शोधण्यासाठी हे साप मानवी वस्तीत किंवा घरात येत असतात. तसेच या काळात घोणस सापांचे प्रजनन काळ चालू होतं असतो.एकाच ठिकाणी हे घोणस साप दोन किंवा तीन पण आढळतात त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी हा साप दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नये, हा साप उसाच्या शेतात पण खूप प्रमातात आढळत आहे.

Oplus_131072

शेतात काम करताना थोडी काळजी घ्यावी तसेच असे साप आपल्या वस्तीत किंवा घराच्या परिसरात निघाल्यास त्याला न मारता आपल्या जवळील वनविभाग किंवा सर्पमित्रांना कळवावे, असे आवाहन सर्पमित्र आकाश माळी यांनी ग्रामस्थांना केले आहे.

Oplus_131072
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे