जबरी चोरी करणारा सराई आरोपी जेरबंद
1 min read
अहिल्यानगर दि.११:- अहिल्यानगर शहरात विविध ठिकाणी जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. अक्षय बाबुराव धनवे (वय ३२, रा. प्रेमदान हाडको, सावेडी, अहिल्यानगर) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून फरार आरोपींची शोध मोहीम सुरू आहे. यात पथकाला सोमवारी (ता. ९) माहिती मिळाली की, फरार आरोपी अक्षय धनवे हा प्रेमदान हाडको परिसरातील त्याच्या घरी येत आहे.
त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. या पूर्वी अक्षय धनवेवर तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. पथकाने पुढील तपासासाठी आरोपीला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले.