मॉडर्न च्या ‘स्काऊट गाईड’ च्या विद्यार्थ्यांनी केली मळगंगा माता मंदिर व परिसर स्वच्छता
1 min readबेल्हे दि.२:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थांनी गुळंचवाडी येथील मळगंगा मातेचे मंदिर व परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला.शिबिरामध्ये मध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड ध्वजारोहण करून शिबिराला सुरुवात केली. स्काऊट गाईड प्रार्थना, ध्वजगीत तसेच सर्वधर्मसमभाव प्रार्थना देखील घेतली. योगा, बी.पी.६ पी.टी. प्रकार केले. कॅम्प मध्ये एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. बेल्हे, गुळंचवाडी येथील मळगंगा मातेचे मंदिर व त्याचा परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास, गाणी, मागाच्या खुणा, स्काऊट गाईडच्या टाळ्यांचे प्रकार यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. कडाक्याचा थंडीमध्ये विद्यार्थ्यांनी संध्याकाळी शेकोटी कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी शेकोटी प्रार्थना घेऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः चूल बनवून चुलीवर स्वयंपाक बनविण्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गार्डच्या मा.राज्य सदस्या व पुणे जिल्हा सहाय्यक आयुक्त गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिराच्या पर्यवेक्षिका अनुपमा पाटे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी स्वतः तयार केलेल्या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडच्या नियमांची ओळख करून दिली आणि इतरही गाणी शिकवली. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांवर स्वयं शिस्त, सत्कृत्य, सर्वधर्मसमभावाची भावना, प्रामाणिकपणा, पर्यावरणमैत्री, बंधुभाव, प्राणिमात्रांवर प्रेम यासारख्या गोष्टी रुजविण्यात आल्या. या शिबिरास विद्यालय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या गाडगे, संस्थेचे विश्वस्त दावला कणसे तसेच शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे व संचालक मंडळ यांनी या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.