पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याला पाणी सोडा:- वल्लभ शेळके

1 min read

राजुरी दि.१:- आळेफाटा परीसरात असलेल्या गावांमधील विहिरींची पाण्याची पातळी खालावली असुन पाण्याची भिषण टंचाई जाणवत असल्याने पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी या परीसरातील शेतकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते वल्लभ शेळके यांनी केली आहे.जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील आळेफाटा , राजुरी,आळे, वडगाव आनंद,पिंपरी,कोळवाडी हया गावांमध्ये अतीशय कमी असा पाऊस झाला असल्याने पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. या परीसरात असलेल्या विहीरी तसेच बोअरवेल मधील पाणी आटल्या आहेत. सध्या हिवाळा चालु असुन रात्री कडक थंडी पडत आहे तर दिवसा कडक असा उन्हाळा पडत आहे वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा फटका विहीरी मध्ये असलेल्या पाण्याला बसला आहे. तसेच कालव्याच्या लगतच्या असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू,कांदा, हरभरा हि पीके घेतली आहेत. तर या परीसरातील शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय करत आहेत व जनावरांसाठी लागत असलेला चारा शेतात घेत असल्याने सध्या पाणी कमी पडू लागल्याने हा चारा पाण्याअभावी जळून जाऊ लागला आहे. त्यामुळे या परीसरातुन गेलेल्या पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेळके केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे