बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने मुलगा वाचला
1 min read
नारायणगाव दि.२८:- येडगावच्या खानेवाडी येथील शरद नेहरकर यांच्या घराजवळ बुधवार (दि. 27) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रुद्र कांबळे हा बारा वर्षाचा मुलगा जात असताना जीप गाडी खाली दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या मुलावर झडप घालण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्याची झडप मुलावर पडण्याऐवजी शरद नेहरकर यांच्या पाळीव कुत्र्यावर पडली. आणि मुलाचा जीव वाचला. कुत्र्याचा मात्र जीव गेला. हा मुलगा घाई घाई बाजूच्या घरामध्ये पळाला. म्हणून तो वाचला.बिबट्याने मात्र शरद नेहरकर यांची पाळीव जर्मण शेफर्ड जातीची कुत्री उचलून उसाच्या शेतामध्ये धूम ठोकली.
केवळ दैव बलवत्तर म्हणून हा बारा वर्षाचा मुलगा वाचला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान याबाबतची माहिती वनविभागाचे वनक्षेत्रपाल लहू ठोकळे यांना दिली असून त्यांनी रात्रीचे गस्त घालणारे वनविभागाचे पथक त्या ठिकाणी पाठविले असून खाणेवाडी या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा.
अशी मागणी शरद नेहकर यांनी केली आहे. गेल्या आठ दिवसापासून आमच्या परिसरामध्ये बिबट्या असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगतोय परंतु पिंजरा लावण्याचे कोणी दखल घेत नाही, अशी खंतही शरद नेहरकर यांनी व्यक्त केली आहे.