जुन्नर तालुक्यात २० फेऱ्यात होणार मतमोजणी; ८ वाजता सुरुवात, दुपारी २ पर्यंत होणार चित्र स्पष्ट; उत्सुकता शिगेला 

1 min read

लेण्याद्री दि.२२:- जुन्नर तालुक्यात पंचरंगी लढत झाली असून यामध्ये खऱ्या अर्थाने विद्यमान आमदार अतुल बेनके, सत्यशील शेरकर, शरद सोनवणे अशी तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा तालुक्यामध्ये आहे.

उद्या शनिवार दि. २३ रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सुरुवातीला पोस्टल मतांची मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरुवात होईल.

तर दुपारी दोन पर्यंत मत मोजण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असून दोन वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली.

जुन्नर तालुक्यामध्ये ११ उमेदवार असून टेबल संख्या १८ आहे तर एकूण २० फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असून कोण विजय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथे मतमोजणी होणार आहे. लोकसभेच्या टक्केवारी पेक्षा विधानसभेला 10.28 टक्क्यांनी मतांची संख्या वाढली आहे.

वाढलेली टक्केवारी कोणाच्या पारड्यात:- जुन्नर विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत ५८.१ टक्के मतदान झाले होते; परंतु २०२४ च्या निवडणुकीत ३ लाख २५ हजार ७६४ पैकी २ लाख २४ हजार ५८५ (६८.९४ टक्के) इतके वाढीव मतदान झाले आहे.

त्यामुळे २०१९ च्या तुलनेत १०.७८ टक्के वाढलेले मतदान जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी आमदारकीच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार हे ठरवणार आहे.

लाडकी बहीण ठरवणार आमदार:- जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी पुरुष १ लाख १८ हजार ४५ तर महिलांचे १ लाख ६ हजार ५३६ इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना जुन्नर तालुक्याचा आमदार कोण होणार हे ठरवणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे