वारुळवाडी- नारायणगाव परिसराला विकासाबाबत अग्रेसर ठेवणार:- आ.अतुल बेनके

1 min read

वारुळवाडी दि.१८:- स्व. वल्लभ बेनके यांची सामाजिक जीवनाची सुरुवात वारुळवाडी – आनंदवाडी येथून झालेली असून वारूळवाडी गावचा झपाट्याने विकास होत आहे वारुळवाडी नारायणगाव परिसराला विकासाबाबत अग्रेसर ठेवण्याचे काम या पुढील काळात केले जाणार असल्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार आमदार अतुल बेनके यांनी प्रचारा दरम्यान वारुळवाडी येथे दिली.वारुळवाडी येथिल भागेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात केली यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे संजय वारुळे तानाजी तांबे जमीर कागदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आरती वारुळे माजी भाऊसाहेब बनकर जंगल कोल्हे संदीप वारुळे श्रीकांत पाटील नितीन गुंजाळ जांबाभाऊ कोल्हे उपसरपंच ज्योती संते परशुराम वारुळे हनुमंत काळे सतिश दळवी डॉ अमोल बंगाल डॉ सुजित दुसाने उल्हास भोर सतिश तवर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होती.यावेळी बोलताना आमदार अतुल बेनके म्हणाले की वारुळवाडी परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातील विकासासाठी भविष्यात लागणारे पाणी कमी पडू देणार नाही तसेच या परिसराचा मुख्य असणाऱ्या येणरे सावरगाव रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.विकासासाठी आमदार अतुल बेनके यांनी कोट्यावधी रुपयांची कामे केल्याने नागरिकांनी यावेळी आमदार अतुल बेनके यांचे आभार मानले.वारुळवाडी आनंदवाडी वृंदावन सोसायटी परिसरात प्रचार रॅलीला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे