समर्थ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे आविष्कार स्पर्धेत यश;पदवी आणि पदव्युत्तर पदवी विभागातून २१८ विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग

1 min read

बेल्हे दि.१६:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकर नगर अकलूज येथे झोनल लेव्हल आविष्कार स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एन.बी.नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग,सोलापूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विराज निंबाळकर व वसंत जाधव हे उपस्थित होते.ॲग्रिकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी,कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ,इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी,ह्युमॅनिटीज लँग्वेज अँड फाईन आर्ट,मेडिसिन अँड फार्मसी,प्युअर सायन्स या सहा विभागातील प्रकल्प व पोस्टर सादरीकरण अश्या स्वरूपाचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी मधून एकूण २१८ विध्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.सदर स्पर्धेत समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे या महाविद्यालयांमधील १४ विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे पदवी शाखेअंतर्गत एग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी या विभागामध्ये वैष्णवी नरवडे हिने व्दितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले तर ह्युमॅनिटीज लैंग्वेज अँड फाईन आर्ट्स या विभागामध्ये आदित्य डेरे याने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले.या विद्यार्थ्यांना प्रा.शुभम गडगे आणि प्रा.प्राची पडवळ यांनी मार्गदर्शन केले.समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्युअर सायन्स या विभागामध्ये अथर्व मुळे याने व्दितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले.तसेच मेडीसिन आणि फार्मसी या विभागांतर्गत पूजा औटी हिने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले.या विद्यार्थ्यांना डॉ.मंगेश होले यांनी मार्गदर्शन केले.या झोनल लेव्हल मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावर सादरीकरणासाठी निवड करण्यात आल्याची माहिती आविष्कार समन्वयक प्रा.शुभम गडगे आणि डॉ.मंगेश होले यांनी दिली.संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ चासकर,रिसर्च इनोवेशन सेल आणि इंटरनॅशनलायझेशनचे संचालक डॉ.प्रतीक मुणगेकर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हतपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे