डॉ. कदम गुरुकुल इंदापूरचा राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत सलग चौथ्यांदा विजय
1 min read
इंदापूर दि.९:- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा (मुले व मुली) 14 वर्ष वयोगट नांदेड शहरातील पीपल्स महाविद्यालय मैदान येथे 6 ते 8 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. पुणे विभागा चे नेतृत्व करीत असलेल्या डॉ. कदम गुरुकुल इंदापूर मुले आणि मुली या संघाने मुंबई,अमरावती, कोल्हापूर, नागपूर या विभागांच्या संघांचा पराभव करून राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा नांदेड या ठिकाणी सलग चौथ्यांदा विजय मिळवून पुणे विभागाचे नाव उंचावले.
विजयी खेळाडूंची(मुली) नावे -आर्या विकास चव्हाण, प्रगती संदीप जगताप,स्वरा तुषार गुजर,अस्मि नितीन राऊत, ऋतुजा सोनबा गिरी, तनया सचिन पवार, शिवांजली राजेंद्र निंबाळकर, तरुन्नम वसीम शेख, मेहेक विपुल लोढा, शर्वली ज्ञानेश्वर देवकर, काव्या योगेश गुंडेकर, सृष्टी जयंत कुंभार,
आराध्या यतिन गुंडेकर, आदित्री मनोज कुमार सिंग, आरोही अमोल रासकर, संस्कृती राजेंद्र गवळी या खेळाडूंनी विजय खेचून आणला. तर (मुले) या संघाची नावे – नविश नंदकुमार यादव, शिवराज पांडुरंग शेरकर, तेज तानाजी कचरे, यश सुरेश शिंदे, वेदांत ज्ञानेश्वर देवकर, वेदांत लक्ष्मण सपकाळ, ओम बालाजी आडसुळे,
अथर्व सचिन मोरे,संजीत अभिजीत यादव, शिवम हनुमंत मोरे, रुद्र अभिजीत पाटील, शिवराज सूर्यकांत कचरे,श्रेयांश मनोज मोरे, आदित्य हरिश्चंद्र काकडे, कृष्णा युवराज हाके, राज रविशंकर सिंग या विजयी खेळाडूंचे व प्रशिक्षक सोमनाथ नलवडे सर,सचिन सूर्यवंशी यांचे डॉ. कदम गुरुकुल चे चेअरमन डॉ. एल. एस. कदम,
शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम सचिव नंदकुमार यादव डॉ. कदम गुरुकुल च्या प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू, स्कूल मॅनेजर संदीप जगताप सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विजयी खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.