आमदार अतुल बेनके यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा
1 min read
शिरोली दि.२:- जुन्नर तालुक्यातील शिरोली (सुलतानपूर), जाधववाडी, साकोरी भागात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी होत आमदार बेनके व सहकाऱ्यांचे उत्साहात स्वागत केले.
जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामे, चिल्हेवाडी पाईपलाईन योजना, वडज उपसा सिंचन यासारखे दीर्घकालीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सुयोग्य नियोजन, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन अशा विविध बाबींचा उल्लेख करत प्रचार केला.
वारकरी आणि संत परंपरेचा वसा आणि वारसा लाभलेला आपला जुन्नर तालुका आहे. या प्रचार दौऱ्या दरम्यान माझे अध्यात्मिक मार्गदर्शक हभप. दक्षिण महाराज बुट्टे, हभप. सुरेश महाराज बुटे, हभप. सुदाम महाराज बनकर,
हभप. पांडुरंग महाराज गाडगे आणि हभप. तबाजी बोऱ्हाडे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि आशिर्वाद घेतले. यावेळी या सर्व जेष्ठ मार्गदर्शकांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक आणि आरोग्यदायी शुभेच्छा व्यक्त केल्या.
विकासकामांच्या जोरावर मला पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.