आत्मविश्वास जागृत करणे हेच आयुष्याचे मुख्य साधन:- उमेश बागडे
1 min readआळेफाटा दि.१ :- ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, संतवाडी, कोळवाडी संचलित ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे, महाविद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उमेश बागडे आळंदी देवाची यांचे साधने आयुष्याची या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी आयुष्याची मुख्य साधने कोणती याविषयी मार्गदर्शन केले. आत्मविश्वास जागृत करणे हेच यशस्वी आयुष्याचे मुख्य साधन आहे, याशिवाय उत्तम शारीरिक संपदा, उत्तम अभ्यास करूनच परीक्षा देणे, शालेय जीवनात उत्तम मूल्य अर्जित करणे हेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अजय कुऱ्हाडे त्यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केल्यानंतर ईशस्तवन स्वागत गीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे व संस्थेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा महाविद्यालयाकडून सन्मान करण्यात आला.
त्यानंतर शाळेमधील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे सर्व पदाधिकारी अजय कुऱ्हाडे अध्यक्ष, सौरभ डोके उपाध्यक्ष, अर्जुन पाडेकर सचिव, अरुण हुलवले खजिनदार, किशोर कुऱ्हाडे माजी अध्यक्ष, भाऊ कुऱ्हाडे माजी अध्यक्ष, उल्हास सहाणे माजी उपाध्यक्ष, बाबुराव कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे – सदस्य पंचायत समिती जुन्नर, दिनेश सहाणे उपसरपंच कोळवाडी, कैलास शेळके, प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे , शांताराम कुऱ्हाडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना चषक, सन्मानपत्र व रोख स्वरूपातील बक्षिसे वितरित करण्यात आली.
प्रमुख अतिथी विशाल भुजबळ उद्योजक , नेताजी डोके अध्यक्ष ज्ञानराज प्रतिष्ठान आळे, धनंजय काळे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट आळे, मारुती पाडेकर चेअरमन विकास कार्यकारी सोसायटी आळे, सागर गुंजाळ चेअरमन महात्मा फुले पतसंस्था आळे, दिलीप आप्पा वाव्हळ चेअरमन ज्ञानराज पतसंस्था आळे, भागाजी शेळके अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ आळे, डॉ. प्रवीण जाधव प्राचार्य बाळासाहेब जाधव महाविद्यालय, विजय कुऱ्हाडे उपसरपंच आळे, विजयानंद कुऱ्हाडे माजी सचिव, बापू गाढवे, गोपाळ अण्णा कुऱ्हाडे, गणेश शेठ गुंजाळ, सखाराम कुऱ्हाडे गुरुजी, सुरेश भुजबळ, सिताराम कोकणे, राजेंद्र कुऱ्हाडे, संतोष पाडेकर इ. उपस्थित होते. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देण्यात आले.