शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त गुंजाळवाडीत जमला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
1 min readबेल्हे दि.१ :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी (ता.जुन्नर) शाळेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या स्थापनेपासूनच्या माजी विद्यार्थी व शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या जुन्या सुमधूर आठवणींना उजाळा देण्यात आला. ग्रामदैवत मुक्ताई चरणी श्रीफळ अर्पण केले. गावचे वैभव कै. हरीभाऊशेठ गुंजाळ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास आरंभ झाला. यापूर्वी शाळेत ज्ञानदान केलेल्या गुरुवर्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन संपन्न झाले. ग्रामनेते रामूदादा बोरचटे व ७५ वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठांच्या हस्ते केक कापून अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. ७५ वर्ष वयाच्या जेष्ठांना यावेळी शालेय व्यासपीठावर सन्मानित करण्यात आले.
शाळेत पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या संपन्न झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये कुऱ्हाडे सर, दिघे सर, तितर सर व मॅडम, प्रभाकर गुंजाळ सर या गुरुवर्यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी माजी विद्यार्थी दत्ता यादव, दत्ता बोरचटे,सिद्धेश बोरचटे, जालिंदर गुंजाळ, किसन बोरचटे, गोविंद बोरचटे, अशोक बोरचटे, बबन गुंजाळ, लक्ष्मण बोरचटे, सरपंच लहूशेठ गुंजाळ इ. नी मनोगते व्यक्त केली.
त्यातून शाळा व शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना दिसून आली. कार्यक्रमास शुभेच्छा देत असताना शाळेस आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. यावेळी जुन्नर तालुका नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मुंबई यांनी शाळेला ११०००रु. रोख सुपूर्द केले.
७५ वर्ष पूर्ण केलेली जेष्ठ मंडळी या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरली. शाळेस वस्तू रुपाने मदत करणाऱ्या दातृत्वसंपन्न देणगीदात्यांना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सन्मानचिन्ह सौजन्य- मुक्तामाता सेवा मंडळ मुंबई, स्टेज डेकोरेशन सौजन्य-सिद्धीविनायक इव्हेंटस-सिद्धेश बोरचटे, आरबाज मुजावर, स्नेहसंमेलन ड्रेपरी सौजन्य – संकेत बोरचटे(लक्ष्मी कृषी सेवा केंद्र बेल्हे)केटरर्स सौजन्य -जाकीर मुजावर, फ्लेक्स सौजन्य -श्रीकृष्णा डिजीटल फ्लेक्स प्रिंटींग बेल्हे/राजुरी यांचे लाभले. संपूर्ण कार्यक्रमासाठी स्नेहभोजन बी.एल.गुंजाळ,सरपंच लहूशेठ गुंजाळ, बारकू बोरचटे, सुरेश बोरचटे, अशोक बोरचटे (H.P.Gas) यांनी दिले.या मेळाव्याने शाळा, शिक्षक अन माजी विद्यार्थी यांचे ऋणानुबंध पुन्हा एकदा सर्वांना अनुभवण्यास मिळाले.
त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रत्यक्षदर्शी दिसून आला. या मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात शिक्षकवृंद तुकाराम खोडदे सर पाटीलबुवा खामकर सर तसेच शा.व्य. समितीचे सतिश बोरचटे,मारूती बोरचटे,प्रशांत औटी सर,राजेश बोरचटे,आशिष पवार सर व सर्व पदाधिकारी, सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत गुंजाळवाडी, समस्त ग्रामस्थ,माजी विदयार्थी यांचे सहकार्य लाभले.