व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘क्रीडा महोत्सव’ संपन्न

1 min read

नगदवाडी दि.२८:- “विशाल जुन्नर सेवा मंडळ” संचलित व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निर्णयक्षमता, सहानुभूती शिस्त आणि सहकार्याची भावना या गुणांचा विकास व्हावा यासाठी ज्युनिअर के.जी ते इ.१० वी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.क्रीडा महोत्सवासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केले.सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून देण्यात आली. सरस्वती पुजन, क्रीडा-साहित्य पुजन तसेच मशालीचे प्रज्वलन उपस्थित मान्यवर हरिचंद्र नरसोडे माजी उपप्राचार्य -रा.प. सबनीस ज्युनियर कॉलेज, नारायणगाव यांच्या हस्ते तसेच विशाल सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड,पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे सदस्य- सत्यवान काळे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वज संचलन केले व क्रीडा प्रतिज्ञा देखील घेतली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिचंद्र नरसोडे यांनी क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून पटवून दिले आपले अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्यांशी हसत- खेळत संवाद साधून त्यांचे मनोरंजन देखील केले.विद्यार्थ्यांसाठी रिले, रनिंग रेस, खो-खो कबड्डी लेग क्रिकेट इ.स्पर्धांचे अंतिम सामने घेण्यात आले.वार्षिक क्रीडा महोत्सवात सर्वांचा सहभाग पाहण्यासारखा होता. विद्यार्थ्यांमध्ये काही वेगळाच जोश होता. विद्यार्थी सर्व खेळाडूंचे मनोबल वाढवत असल्याचे पहायला मिळाले. क्रीडा शिक्षक विनायक वऱ्हाडी व पराग चिल्लारे, शिक्षक अमोल जाधव यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा आयोजनासाठी मोलाची कामगिरी पार पाडली. सर्व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक व सांघिक स्पर्धा खिलाडू वृत्तीने पार पाडल्या. कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका सबा पटेल, कीर्ती जगताप, मनीषा हांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व संघाचे अभिनंदन करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.अशा प्रकारे शाळेच्या मुख्याध्यापिका,समन्वयिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने क्रीडा स्पर्धा- उत्साहात पार पडल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे