अजित पवार गटाकडून १७ जणांना एबी फॉर्म; उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच एबी फॉर्मचे वाटप

1 min read

मुंबई, दि. २१- सोमवारी शिंदे गट आणि अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, यादी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सोमवारी १७ जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. १३ जणांना अर्ज देण्यात आले आहेत.एबी फॉर्म मिळणाऱ्यांमध्ये राजेश विटेकर – परिषद आमदार (इच्छुक), संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, दौलत दरोडा, राजेश पाटील, दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, भरत गावित, बाबासाहेब पाटील, अतुल बेनके आदींचा समावेश आहे.यातील भरत गावित हे आधी भाजपमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. भरत गावित यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. त्यावेळी त्यांचा काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांनी पराभव केला होता. आता भरत गावित यंदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे