राज्य सरकारची जाहिरातींवर ५५० कोटी रुपयांची उधळपट्टी, आमदार रोहित पवार यांचा आरोप

1 min read

इचलकरंजी दि.१५:- राज्यावर ४० ते ५० हजार कोटी रुपयांची उधारी आहे. असे असाताना देखील राज्य सरकारने जाहिरातींवर ५५० कोटी रुपये उधळले आहेत, असा आरोप शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला.येथील जवाहरनगरमध्ये श्रीराम ट्रस्टच्या वतीने दसऱ्यानिमित्त आयोजित ५१ फुटी रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पवार म्हणाले, महागाई व भ्रष्टाचार वाढवणारा विचार येत्या विधानसभेला पराभूत करायचा आहे. राज्याच्या राजकारणात ५० हा आकडा महत्त्वाचा आहे. तो भ्रष्टाचाराचा प्रतिकही आहे. त्यामुळे ५० फुटी रावण दहन करायचे आहे. समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. जनतेच्या हाताला काम, पोटाला अन्न आणि पुरोगामी विचाराची गरज आहे. देशातील राजकारणामध्ये नेत्यांचे भले होते. मात्र, सामान्यांचे भले होत नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे