दारुड्या पतीचा पत्नीने काढला काटा; डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉड ने बेदम मारहाण

1 min read

औरंगपुर दि.१०:- जुन्नर तालुक्यातील औरंगपूर येथील खंडोबा रोड थापमाळा येथे सोमवार दी.९ रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पत्नीने सतत दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीचा खून केल्याची घटना घडली असून नारायणगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत देवराम सोना डुकरे (वय 54) राहणार औरंगपुर तालुका जुन्नर) हे आपल्या घरात पत्नी दिपाली देवराम डुकरे पत्नी सोबत राहत असताना दारू पिऊन सतत त्रास देत असल्या कारणावरून पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून खाली पाडून. लोखंडी रॉडने डाव्या हाताच्या दंडावर, मनगटावरती, कपाळावर, डोक्याला मागील बाजूस गंभीर जखमी करून खून केला. या बाबतची फिर्याद मुलगी रजनी प्रदीप गांजवे व 29 राहणार गांजेवाडी तालुका आंबेगाव हिने नारायणगाव पोलिसांत दिली आहे.

या वेळी तात्काळ घटनास्थळी रमेश चोपडे (ॲडिशनल एस पी पुणे ग्रामीण), डीवायएसपी रवींद्र चौधर, नारायणगाव चे पोलीस निरीक्षक महादेव शेलार, नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ भेट देऊन तपास केला व आरोपीला अटक केली. पुढील तपास जे.आय पाटील पो. स.ई करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे