तालुकास्तरीय खो- खो स्पर्धेत व्हि.जे.इंटरनॅशनल स्कूल चा संघ उपविजेता
1 min readनगदवाडी दि.७:- बुधवार व गुरुवार दि. 4 सप्टेंबर व दि.5 सप्टेंबर 2024 रोजी विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्हि.जे.इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणामध्ये रंगलेल्या मुले व मुली यांच्या खो-खो क्रीडा स्पर्धांची सांगता झाली. विशाल जुन्नर व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी. कांदळी यांच्या संयुक्त विद्यमाने या तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जुन्नर तालुक्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. वयोगट 14/ 17/ 19 मुले व मुली यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या खो- खो स्पर्धांमध्ये काही शाळांच्या संघांनी विजयी बाजी मारली. तर काही संघ उपविजयी झाले.14 वर्षीय वयोगट मुली यामध्ये व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी या विद्यार्थिनींचा संघ उपविजयी ठरला असून या विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक यांनी शाळेचे नाव पंचक्रोशीत उंचावले.
सावरगाव बीटचे शिक्षण विस्तार-अधिकारी पंचायत समिती जुन्नर विष्णू धोंडगे तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच विश्वस्त संपत काने, विश्वस्त विक्रांत काळे तसेच प्रफुल्ल बोरचटे, सुरेश औटी व शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या शुभहस्ते या उपविजेत्या ठरलेल्या मुलींच्या संघाला सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी सर्व रेफ्री (पंच) शाळेचे क्रीडा शिक्षक विनायक वऱ्हाडी, पराग छिल्लारे तसेच समन्वयिका जयश्री कुंजीर, श्वेता कोकणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी उपविजयी ठरल्याचा जल्लोष करून आनंद व्यक्त केला. स्पर्धांचे आयोजन व यशस्वीतेसाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.