पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग रद्द करण्यासाठी राजुरीत साखळी उपोषण
1 min read
राजुरी दि.२७:- पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग क्रमांक ११ रद्द करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांचे राजुरीत (ता.जुन्नर) येथे मंगळवार दि.२७ पासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
या साखळी उपोषणास जुन्नर तालुक्यातील औरंगपूर, निमगाव सावा, जाधववाडी, तांबेवाडी, गुंजाळवाडी, राजुरी, कोळवाडी, संतवाडी येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
पूर्वीचा पुणे- नाशिक रस्ता, बेल्हे- जेजुरी मार्ग, प्रस्तावित पुणे- नाशिक रेल्वे महामार्ग हे सर्व असताना बागायती क्षेत्रातून हा मार्ग होत असल्याने शेतकर्यांनी तीव्र विरोध केला आहे. यावर योग्य निर्णय झाला नाही? ठोस आश्वासन मिळाले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होत जाणार असल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांना दिली.