जुन्नर किंवा खेड तालुक्यात पासपोर्ट कार्यालय व्हावे:- खासदार डॉ.अमोल कोल्हे

1 min read

पुणे दि.२२:- शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर, जुन्नर, आंबेगाव या भागातील नागरिकांना पासपोर्ट बनवण्यासाठी शिरूर येथील पासपोर्ट कार्यालयात यावे लागते. या भागाचे ऐतिहासिक, अध्यात्मिक, औद्योगिक महत्व पाहता राजगुरुनगर, जुन्नर, आंबेगाव या भागातून पासपोर्टची मागणी मोठ्या प्रमाणात असते.

मात्र, पासपोर्ट बनवण्यासाठी या भागातील नागरिकांना शिरूर पासपोर्ट कार्यालयात यावे लागत असल्याने नागरिकांसाठी हे प्रचंड गैरसोयीचे ठरत आहे.म्हणूनच खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस.जयशंकर जी यांना पत्र लिहून खेड तालुक्यात.

किंवा जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय निर्माण करावे अशी मागणी केली आहे. नागरिकांचे हित लक्षात घेता या विनंतीचा सकारात्मक विचार केला जाईल हा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे