मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, घरात ५ कोटी ६० लाख रोकड, १ कोटींची ४ घड्याळं!

1 min read

पुणे दि.२१:- पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. मंगळवारी ईडीच्या पथकाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता घरात ५ कोटी ६० लाखांची रोकड तसेच १ कोटींची ४ घड्याळे आढळून आली. मंगळवारी रात्री उशिरा ईडीने बांदल यांच्यावर अटकेची कारवाई केली.मंगळवारी ईडीच्या पथकाने बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानांवर छापे टाकले होते. जवळपास १६ तासांच्या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना ताब्यात घेतले. पथकाला बांदल यांच्या घरात काही महत्त्वाचे कागदपत्रे तसेच ५ कोटी ६० लाखांची रोकड आढळून आली.

पुण्यातल्या दोन्ही निवासस्थानी ईडीचा छापे आणि कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. मंगलदास बांदल यांची शिरूर आणि पुण्यात निवासस्थाने आहेत. मंगळवारी सकाळी शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी आणि दोन भावांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली तर पुण्यातील महंमदवाडी येथील बंगल्यावर जाऊनही पथकाने झाडाझडती घेतली. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी बांदल यांना मुंबईत आणले आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात आणले जाईल. ईडीचे वकील त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करतील.कोण आहेत मंगलदास बांदल? मंगलदास बांदल हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती होते. राजकारणी म्हणून जशी त्यांची ओळख आहे तशी विविध गुन्हे दाखल झाल्याने ते नेहमीच वादात राहिले.

पुणे जिल्हा बँकेच्या कथित फसवणूक प्रकरणात बांदल जवळपास दोन वर्ष तुरुंगात होतेफसवणूक, खंडणीसह विविध प्रकरणात त्यांच्या नावावर गुन्हे आहेत.तुरुंगातून बाहेर पडून त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रीय होण्यासाठी नेतेमंडळींची भेट घेतली पण त्यांना कोणत्याही पक्षाने सक्रीय राजकारणात संधी दिली नाही.

वंचितने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना शिरूरची उमेदवारी दिली होती.परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या इंदापूर येथील भाजपच्या मेळाव्याला ते हजर राहिले.त्यामुळे वंचितने त्यांची उमेदवारी मागे घेतले. फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याची सातत्याने चर्चा १६ तासांच्या चौकशीनंतर अटक ईडीने तब्बल 16 तास कारवाई केली होती. यावेळी मंगलदास बांदल यांची कसून चौकशीही करण्यात आली. तसेच शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. तर, महंमदवाडी येथील बंगल्यात राहत असलेल्या मंगलदास बांदल यांचीदेखील ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ईडीच्या या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे