विनापरवाना झाड तोडल्यास होणार ५० हजार दंड, मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
1 min read
मुंबई दि.८:- मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार आता झाड तोडल्यास एक हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे झाडांची कत्तल करण्याला आळा बसणार आहे. विनापरवाना जंगल तोडणाऱ्यांसाठी वन विभागाने हे मोठ पाऊल उचलले आहे. या दंडाची तरतूद असणारा शासन निर्णय लवकरच पारित होणार आहे.
यापूर्वी विनापरवाना झाड तोडल्यास फक्त 1 हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. पण झाडे तोडल्याने होणाऱ्या परिणामांचा विचार करुनच हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.दंडाशिवाय अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी. वापरलेली हत्त्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येणार आहेत. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ मधील कलम ४ मध्ये करण्यात येऊन शासन अध्यादेश मांडणार आहे.