पुण्यातील अनधिकृत शाळेच्या मुख्याध्यापक, अध्यक्ष, संचालक यांच्यावर गुन्हा दाखल

1 min read

पुणे दि.२०:- ईरा एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल उंड्री या अनधिकृत शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी चिंचवड येथील ऑर्चिड स्कुलवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातील शाळेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ज्ञानदेव आबाजी खोसे (वय-55 रा. श्रीगणेश सोसायटी, वाघोली) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल उंड्री संस्थेचे अध्यक्ष जे डीकोस्टा (रा. बेंगलोर), संचालक समीर गोरडे (रा. विमाननगर, पुणे), मुख्याध्यापीका अनिता नायर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 318(4),336(2), 336(3),3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै 2024 पासून संशयितांनी शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींची पूर्तता न करता ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल सुरू ठेवले. या शाळेत इयत्ता 1 ली ते 10 वी चे अनधिकृत वर्ग सुरु केले. हे वर्ग सुरु करण्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी अथवा मान्यता घेतली नाही. तसेच शाळा अधिकृत असल्याचे पालकांना भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली. विद्यार्थ्यांचे दाखले व इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, विद्यार्थी व पालक यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे