पावसाळ्यातही आणे पठारावर पाण्याचे संकट कायम; पंकज कणसे प्रतिष्ठान चे टँकर ठरतंय वरदान; अद्यापही मोफत पाणी पुरवठा सुरू

1 min read

आणे दि.३ :- राजुरी उंचखडक (ता.जुन्नर) येथील पंकजभाऊ सोपान कणसे यूवा प्रतिष्ठानकडून आणे पठारावरील दुष्काळग्रस्त पाच गावांना मोफत पाण्याची सोय गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे. जोपर्यंत मोठा पाऊस पडत नाही. तोपर्यंत या गावांना असाच मोफत पाणीपुरवठा करणार असल्याचे पंकज कणसे यांनी सांगितले. पंकज कणसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त टँकर सुरू केले होते. पावसाळ्याचा जून महिना सरला असून देखील आणे पठारावर मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे अध्यापही पाण्याचे संकट कायम आहे.

आणे, नळवणे, व्हरुंडी, शिंदेवाडी, पेमदरा, आनंदवाडी या सर्व गावांना ज्या ठिकाणी पाण्याची गरज आहे त्या ठिकाणी तात्काळ हे टँकर जाते. प्रतिष्ठान ने २५ हजार लिटर क्षमता असलेले हे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे.

पंकज कणसे यांना मुबलक पाणी असल्यामुळे त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सदर पाणी हे आणे पठारावरील दुष्काळग्रस्त गावांना देण्याचे ठरवले होते. आणे पठारावर माणसांची व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची ऐन पावसाळ्यात ही मोठी समस्या भास आहे.

या प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत या गावांना मोफत पाणीपुरवठा करणारं टँकर एप्रिल महिन्यात आणे येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू केले होते. पावसाळ्यात सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपत पंकज कणसे प्रतिष्ठानचे टँकर सुरू आसल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते. सामाजिक कार्यकर्ते बाबाजी शिंदे, अमोल शिंदे, पाटील गाडेकर, आनंदा बेलकर, डॉ. दीपक आहेर, माऊली संभेराव, राम गगे ,रोहिदास शिंदे, किशोर आहेर, पांडू गाडेकर, प्रदीप आहेर, वैभव आहेर, रामदास गुंजाळ.

आनंदा गुंजाळ, किसन गुंजाळ, मयूर गुंजाळ, निलेश वाळूंज, प्रवीण कणसे, भाऊसाहेब गुंजाळ तसेच आणे पठारावरील जनतेने पंकज कणसे प्रतिष्ठानचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे