सिंहगड कॉलेज मध्ये अपारंपारिक ऊर्जा स्रोतावर आधारित प्रयोगशाळेची उभारणी

1 min read

वडगाव (बु.) दि.१९:- सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव (बु.), पुणे महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागामध्ये सौरउर्जेवर चालणाऱ्या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आल्याची माहिती प्रा. एम. एन. नामेवार व प्रा. तुषार काफरे यांनी दिली.

केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासन अपारंपारिक ऊर्जास्रोतांच्या वापरावर आग्रही असून विविध सवलतीच्या दरावर सदर उपकरणे उपलब्ध करून देत आहे. याचाच भाग म्हणून विभागातील डॉ. श्रीशैल मुळे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून सदर प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली. सदर प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी स्टडी मेट्रो, पुणे यांनी आर्थिक सहायता केली आहे.प्रयोगशाळेचे उद्घाटन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वडगाव (बु.) पुणे चे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाय. पी. रेड्डी, विभागप्रमुख डॉ. एम. बी. माळी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे