तिर्थक्षेत्र आळंदी येथे निघोट परिवाराची बारशी ची पाऊणशे वर्षांची परंपरा कायम!
1 min read
मंचर दि.६:- सद्गुरू कोंडाजी बाबा डेरे यांच्या आशिर्वादाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी आणि पदस्पर्शाने पावन परमपवित्र आळंदी नगरीत निघोटवाडी येथील आळंदी पंढरपूर ची नित्यनेमाने वारी करणारे कै.हभप मारुती गोविंदा निघोट यांनी सद्गुरू हभप कौंडाजी बाबा डेरे यांच्या आशिर्वादाने सुरू केलेल्या वैशाखी बारशी ची परंपरा सुरू केली.
वारकरी बंधुभगीनींना बारस सोडण्यासाठी आळंदी येथील मराठा फ्रुटवाले धर्मशाळा येथे प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात सुरू केलेल्या बारसीची परंपरा कै.नारायण मारुती निघोट यांनी सोयीसुविधा नसताना, अनंत अडचणींवर मात करत अखंड चालू ठेवली. बालगीत वारकरी अन्नदानासाठी अनेक जण सहभागी होऊन नंतर बाजूला झाले पण नारायण निघोट यांनी आपल्या वडीलांनी चालू केलेली बारस तहहयात सुरू ठेवली. त्यांच्या मुलांनी हे अन्नदानाचे पवित्र काम सुरू ठेवले.
प्रा.अनिल नारायण निघोट आणि प्रा सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख, मुलगी डॉ सोनल, मुलगा शैलेश, सुनबाई आकांक्षा यांनीही ही वारकऱ्यांना बारस जेवणाची परपरा चालू ठेवुन आंबारसाचे गोड जेवण करून वारकरी बंधुभगीनींचे आशिर्वाद घेतले.
याहि पुढे ही बारस कायम चालू ठेवण्याचा मानस व्यक्त केला.पंचाहत्तर वर्षे ही अखंड परंपरा चालू ठेवल्याने संपूर्ण परिसरात कौतुक केले जात असुन प्रेरणादायी काम असल्याने या परिवाराबाबत आदर व्यक्त केला जात आहे.