दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात प्रवेश सुरू
1 min read
निमगाव सावा दि.४ :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित व श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे शैक्षणिक वर्ष 2024- 25 साठी प्रवेश सुरू झाले आहेत.
अकरावी व बारावी कॉमर्स आणि सायन्स, तसेच बी.ए., बी. कॉम., बी.एससी., यशवंतराव चव्हाण विद्यापीठ अंतर्गत एम. ए., एम. कॉम. कोर्सेस साठी प्रवेश सुरू झाले आहेत. नॅक मूल्यांकन महाविद्यालय असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश सुरू झाले आहेत. मुलींसाठी मोफत शासकीय नियमानुसार महाविद्यालयात प्रवेश केले जाणार आहेत.
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये:– अत्यल्प प्रवेश फी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, उज्ज्वल निकालाची परंपरा, उच्च शिक्षित, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, अद्यावत संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज व संगणकीकृत ग्रंथालय, कमवा व शिका योजना, राष्ट्रीय सेवा योजना, व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा, सुसज्ज लेक्चर हॉल, नोकरीसाठी कॅम्पस इंटरव्यू व मार्गदर्शन केंद्र, मुला मुलींसाठी राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थ्यांसाठी HP Foundation Scholarship, विद्यापीठ व शासकीय शिष्यवृती योजना, महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना, करिअर कट्टा मार्गदर्शन केंद्र, चालू शैक्षणिक वर्षापासून पोलीस प्रशिक्षण अकॅडमी सुरू.
तरी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने निमगाव सावा परिसर व पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित आपला प्रवेश निश्चित करावा असे महाविद्यालयाकडून आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:- प्राचार्य प्रल्हाद शिंदे. 7709940474 पत्ता :- दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा, तालुका- जुन्नर, जिल्हा- पुणे.