आनंद मेळाव्यातून मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी केली ५० हजारांची उलाढाल

1 min read

बेल्हे दि.१९:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये फन फेअर (आनंद यात्रा) चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिली ते बारावीच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. या यात्रेत विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल व फनी गेम्स लावण्यात आले होते.

विविध पदार्थ बनवण्यापासून ते विक्री पर्यन्त सर्व कामे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पार पाडली. या मध्ये विक्री करून विद्यार्थ्यांनी ५० हजार रुपयांची उलाढाल केली.

मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनात भाज्या कापणे, एखादा पदार्थ बनवणे, बाजारातून वस्तू आणणे, त्याचा हिशोब ठेवणे, खरेदी – विक्री करणे याचे प्रत्यक्ष शिक्षण देण्यासाठी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या यात्रेत पाणीपुरी, छोले-बटुरे, समोसा, भेळ, लिंबू सरबत, टरबूज, मिठाई, दाबेली, सँडविच, मसाला पापड, कैरी पन्हं, भेळपुरी, जूस, लस्सी, ओली ,सुक्की व चायनिज भेळ, मूग चॅट, मटकी चॅट, इडली, मँगो जुस, मॅगी अशा विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती.

या वेळी काही खाद्यपदार्थ विद्यार्थांनी घरून बनून आणले होते तर काही शिक्षकांच्या मदतीने शाळेत बनवण्यात आले. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्या विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसे,

उपप्राचार्य के.पी सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती व विद्यार्थ्यांच्या उत्साहात आनंद मिळावा पार पडला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे