सह्याद्री व्हॅली आभियांत्रिकी महाविद्यालयाचे ‘स्नेहसंमेलन’ उत्साहात संपन्न
1 min readबेल्हे दि.९:- महारिया चारीटेबल ट्रस्टचे सह्याद्री व्हॅली आभियांत्रिकी महाविद्यालयाचे राजुरी (ता.जुन्नर) वार्षिक स्नेहसंमेलन सह्याद्री फेस्ट २०२४, दिनांक १ ते ६ एप्रिल २०२४ दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सनदी अधिकारी सुभाष घाटकर संस्थेचे संचालक किशोर पटेल,गणपत कोरडे, डॉ. के. आर. भानुशाली, सचिन चव्हान. प्राचार्य डॉ.संजय झोपे, उप प्राचार्य पी. बालारामडू यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यामध्ये बी इ प्रथम क्रमांक थोरात सायली, टी इ कम्प्युटर प्रथम क्रमांक अक्षय धनवटे, एस इ कम्प्युटर इंजीनियरिंग प्रथम क्रमांक सीमा देवकाते. एस इ ए आय एम एल प्रथम क्रमांक प्रिया शिंदे बी इ इलेक्ट्रॅानिक्स अॅँड टेलीकम्युनिकेशन प्रथम क्रमांक विक्रम शिंगोटे, टी इ प्रथम क्रमांक प्रियंका हांडे, एस इ प्रथम क्रमांक स्नेहल मुन्डिक, बी इ प्रथम क्रमांक सिव्हील सागर गाडेकर, टी इ प्रथम क्रमांक सिव्हील विक्रम जोरवार, एफ इ प्रथम क्रमांक वैष्णवी पाडेकर इत्यादी विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे विशेष कौतुक करून सरांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या औद्योगिक भेटी, नाविन्यपूर्ण प्रकल्प स्पर्धा, चर्चासत्रे, नोकरी मेळावे या प्रोत्साहनात्मक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सातत्याने सहभागी होऊन आपली चिकीत्सक वृत्ती विकसित करण्याचे आव्हान संस्थेचे संचालक के. आर. भानुशाली यांनी केले. यासाठी व्यवस्थापन सदैव विद्यार्थी व प्राध्यापकांच्या पाठीशी असेल असे आश्वासन त्यांनी दिले. या स्नेहसंमेलनातर्गत इनडोअर व आउटडोअर विविध क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये क्रिकेट, कब्बडी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, कॅरम, बुद्धिबळ बँटमिंटन इत्यादि. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये नृत्य, कला, नाटक, फॅशन शो, एकपात्री अभिनय, समाजप्रबोधन ,भारतीय एकात्मतेचे दर्शन इत्यादी. कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली. सहा दिवस चाललेल्या या सह्याद्री फेस्ट २०२४ कार्यक्रमांनी प्रा. मनोज कुमार यांच्या नेतृत्वाखाली चांगलीच उंची गाठली. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहुन पालक तसेच आलेले प्रमुख पाहुणे यांनी उत्स्फूर्त दाद दिली. व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले तर परीक्षक म्हणून ग्रंथपाल उद्धव भारती आणि प्रा. कल्पना निचित, यांनी काम पाहिले. तर प्रा. भागवत रांधवण, प्रा. भालचंद्र मुंढे, प्रा. वैभव नांगरे, प्रा .सागर रसाळ, प्रा.अमोल जगदाळे, प्रा. मयूर घाडगे, प्रा. मिनाज पटेल, प्रा.आश्विनी हाडवळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तत्पूर्वी उप प्राचार्य पी. बालारामडू यांनी वेलकम स्पीच दिले व सर्व पालकांचे व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे संचालक किशोर पटेल,गणपत कोरडे, डॉ. के. आर. भानुशाली, सचिन चव्हान, प्राचार्य डॉ.संजय झोपे, उप प्राचार्य पी बालारामडू, आणि सर्व विभाग प्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते जिंकलेल्या संघाना व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्नेहसंमेलनाची सुरवात गणेश वंदनेने करण्यात आली. तर शेवट वंदे मातरम या गीताने करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा देवकाते व मुक्ता पांचाल या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.