उंचखडक येथील श्री भैरवनाथ यात्रोत्सवात धावले ४२६ बैलगाडे
1 min read
उंचखडक दि.२८:- राजुरी, उंचखडक (ता.जुन्नर)येथील श्री भैरवनाथाच्या यात्रौत्सवाच्या निमित्ताने भव्य अश्या बैलगाड्यांच्या शर्यती पार पडल्या या स्पर्धेत पुणे, ठाणे, नगर, नाशिक तसेच सातारा जिल्ह्यातील ४२६ बैलगाडे धावले.तिन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी क्रमांकाची फळीफोड नाथा रामचंद्र आणे, किरण भुजबळ महाकालेश्वर बैलगाडा संघटना नारायणगाव व बाळासो.महाकाळपिंटया ग्रुप मा़दारणे यांच्या बैलगाड्याने फोडली. तर द्वितीय क्रमांकांची फळीफोड कै. बबन शिवराम वंडेकर पिंपरी पेंढार,प्रमोद ज्ञानेश्वर मंडलिक बेलसर,वैभव गेनभाऊ सोलाट गुंजाळवाडी,साई प्रमोद वायकर आळेफाटा यांचा बैल गाड्यांने फोडली.तसेच तिस-या दिवशीची फळीफोड नानासाहेब गुळवे आर्वी, अजिंक्य शांताराम जाधव बोरी,भास्कर रामू कुरकूटे,कै. रघुनाथ अमृता मोरे मोरदरा यांच्या बैलगाड्याने फोडली.
तर फायनल मध्ये तीन दिवसांमध्ये प्रथम क्रमांकात किशोर गेनभाऊ दांगट व पप्पुदादा मित्र मंडळ ,विशाल गोविंद शिनारे ,अशोक तुळशिराम कणसे व पै.राहुल पोपट मोरे,धनेश टेमकर,आर्यन खांदवे अजित काळे, देवदास गाडेकर यांचा नंबर आला तर द्वितीय क्रमांकात कै.रमण महादू निलख,कै.बाळशिराम लांडगे,नाथा रामचंद्र गाडेकर,योगी सांम्राज्य.
जयराम सखाराम भिंडे सचिन घोलप,विलास घोलप, युवराज शिंदे,वैभव सोलाट,भगवान शिंदे, निवांत गुंजाळ,अन्वी दाभाडे यांचा आला तसेच तृतीय क्रमांकात मल्हार स्वप्निल डुंबरे,दिनकर लक्ष्मण डेरे,पांडुरंग पवार, सुरेश कणसे,प्रशांत डोंगरे ,प्रकाश कबाडी ,प्रकाश वामन पांडुरंग काळे यांचा नंबर आले.घाटाचा राजा म्हणुन पहिल्या दिवशी नामवंत बैलगाडा मालक किशोर दांगट.
दुस-या दिवशी विशाल शिनारे तर तिस-या दिवशी धनेश टेमकर ,आर्यन खांदवे अजित काळे यांचा बैलगाडा ठरला तसेच या ठिकाणी प्रथम क्रमांकात ६२, तर द्वितीय क्रमांकात १३२,तृतीय क्रमांकात ९०,चतुर्थ क्रमांकात ४९ असे ऐकुन ३३३ बैलगाडे बक्षीस पात्र ठरले प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपयांचे द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार,तृतीय क्रमाकांस ५० हजार व चतुर्थ क्रमांकास २५ हजाराचे बक्षीस तर फळीफोड गाड्यांसाठी तिनं दिवसांसाठी ८४ हजार देण्यात आले.
घाटाचा राजासाठी एक नंबर फायनल साठी दररोज ११ हजार ट्राॅफी तर फायनल साठी दररोज एक मोटार सायकल देण्यात आली व तिने दिवसांमध्ये २०फुटि कांडे जोडुन प्रथम क्रमांकात आलेल्या बैलगाड्यास २० हजार ७०७ रूपयांचे बक्षीस देण्यात आले. या यात्रोत्सवाला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे.
माजी सभापती दिपक औटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार,शरद लेंडे,स्नेहल शेळके,शाम माळी,विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, संचालक कुंडलिक हाडवळे,दिलीप कोल्हे, गावच्या सरपंच प्रिया हाडवळे,सुवर्णा कणसे ,उपसरपंच माऊली शेळके,अजय कणसे.
वल्लभ शेळके, एम.डी.घंगाळे, एकनाथ शिंदे गावातील सत्य व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ गाडा शौकीन उपस्थित होते.यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी भैरवनाथ देवस्थान चे अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सचिव ,खजिनदार सर्व संचालक मंडळ,यात्रौत्सव कमीकमी,नवरात्रोत्सव कमीटी सभासद ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.