यशस्वी होण्यासाठी बोलण्याची कला शिका – प्रा.अशफाक पटेल

1 min read

नारायणगाव दि.६- आपल्याला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात बोलण्याची कला शिकावी असे प्रतिपादन प्रा.अशफाक पटेल यांनी केले.ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव आयोजित गुरुवर्य रा.प.सबनीस आंतर महाविद्यालयीन वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात परीक्षक म्हणून ते बोलत होते.या स्पर्धेचे उदघाट्न ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रविंद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ.आनंद कुलकर्णी, संचालक ऋषिकेश मेहेर, संचालक डी.के.भुजबळ, प्राचार्य प्रा.डॉ.आनंद कुलकर्णी, उपप्राचार्य जी.बी. होले, मराठी विभागप्रमुख डॉ.मिलिंद कसबे. प्रा.डॉ.शिवाजी टाकळकर, प्रा.डॉ.मंगल डोंगरे, परिक्षक हभप रमेश ढोमसे, डॉ.रोहिणी मदने, प्रा.पुरुषोत्तम काळे, प्रा.अशफाक पटेल, प्रा.डॉ.श्रीकांत फुलसुंदर, प्रा.डॉ.रसूल जमादार, प्रा.डॉ.अनिल काळे, प्रा.डॉ.दिलीप शिवणे, प्रा.डॉ.शरद काफले, प्रा.डॉ.अनुराधा घुमटकर, विद्यापीठ प्रतिनिधी दीपेश पानसरे, यासंह महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच विविध महाविद्यालयाचे सहभागी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या वक्तृत्व स्पर्धेत रसिका डुंबरे, आळे (प्रथम), अनिकेत डमाळे, अहमदनगर (द्वितीय), प्रतिक जाधव, संगमनेर (तृतीय), मोनिका खिल्लारी, नारायणगाव व सुशांत खैरे, नारायणगाव (चतुर्थ) यांनी बक्षीस पटकवले तर वादविवाद स्पर्धेत महेश उशीर, अहमदनगर ( प्रथम), प्रतिक जाधव, संगमनेर (द्वितीय), सानिका खंडागळे, नारायणगाव (तृतीय), अनिकेत डमाळे, अहमदनगर (चतुर्थ) या विद्यार्थ्यांनी बक्षीस पटकावले. तर वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक चषक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगावचे विद्यार्थी तसेच वादविवाद स्पर्धेचा सांघिक चषक न्यु आर्ट्स महाविद्यालय अहमदनगर यांनी पटकवला. यानिमित्ताने आयोजकांच्यावतीने विद्यार्थीनी प्रतिभा दरेकर, शेवगाव हिला विशेष उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.यानिमित्ताने बक्षीस वितरणप्रसंगी प्रा.पुरुषोत्तम काळे, प्रा.अशफाक पटेल, हभप रमेश ढोमसे, डॉ.रोहिणी मदने, डॉ.शिवाजी टाकळकर, डॉ.मिलिंद कसबे, प्राचार्य डॉ.आनंद कुलकर्णी, यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेसाठी डॉ.जगदाळे, प्रा.गायकवाड, प्रा.आवटे प्रा.पूजा वाव्हळ, प्रा.अंकिता शेळके, प्रा.कविता सोनवणे यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. मिलिंद कसबे यांनी केले तर आभार वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा संयोजक डॉ.मंगल डोंगरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे