दोन महिलांना मारहाण व बेशुद्ध करून घरातील दोन लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लुटली
1 min readबेल्हे दि.२:- साकोरी फाटा बेल्हे (ता. जुन्नर) येथील लता मटाले यांच्या घरात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी चोरी करून एकूण २ लाख ५ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला असून याबाबत आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या माहिती अशी की, साकोरी फाटा येथील लता विष्णू मटाले (वय ४७) यांच्या घरात रात्रीच्या दरम्यान अज्ञात ३ चोरट्यांनी शिरून चोरी करून सोन्याचे दागिने तसेच काही रोख रक्कम असा एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. याबाबतची फिर्याद लता म्हटले यांनी आळेफाटा पोलिसात दिली आहे. या बाबत अधिकची माहिती अशी की, दि.३० जुलै रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी घरात शिरून लता मटाले तसेच त्यांची सासु रेऊबाई मटाले या दोघीच घरी असताना घरामध्ये शिरून दोघींना दमदाटी करत मारहाण करायला सुरुवात केली.चोरट्यांनी लता मटाले यांच्या तोंडावर रुमाल लावून बेशुद्ध केले. त्यांची सासु रेवुबाई हिस मारहान करून तिचे अंगावरील दागिने तसेच कानातील दागिने बळजबरीने ओढून घेऊन दोघींना जबर मारहाण केली. कानातील दागिने ओढताना रेऊबाई यांच्या कानाला इजा होऊन फाटला आहे. तसेच घरातील कपाटामध्ये ठेवलेले दागिने व मांडणीवर पाकीटातील रोख रक्कम चोरून नेली. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गर्शनाखाली पुढील तापास सहायक पोलिस निरीक्षक अनिल पवार करत आहेत.