आशिष माळवदकर यांच्या फ्लॅट मध्ये चोरी करणारे चोरटे नारायणगाव पोलिसांनी केले गजाआड; २२ लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिन्यांची झाली होती चोरी

1 min read

नारायणगाव दि.३०:- नारायणगांव पोलीस स्टेशन हददीत दिनांक १४ मे २०२३ रोजी सकाळी १०.३० ते रात्री ०८.०० वा.चे. दरम्यान मौजे नारायणगांव डिमळे मळा, श्री. गजानन अपारमेंट, तिसरा मजला येथील आशिष गजानन माळवदकर यांचे राहते फलॅट चा दरवाज्याचे कडी कोयंडा तोडुन त्यावाटे फलॅटमध्ये प्रवेश करून बेडरूमचा दरवाज्याचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करून. लाकडी कपाटाचे डाव्हर उघडुन त्यात ठेवलेले एकुण २२,०२,५००/- रू किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करून नेले बाबत नारायणगांव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदरचा गुन्हा उघड करण्याच्या दुष्टीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो, मा.अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर रविंद्र चौधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगांव पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोसई सनिल धनवे यांना सदरचा गुन्हा उघड करण्याच्या दुष्टीने योग्य त्या सुचना दिल्या त्यानुसार स्था. गु. शाखा व नारायणगांव पोलीस स्टेशन असे संयुक्त ४ ते ५ पथके तयार करून वेगवेगळया ठिकाणी रवाना केली होती.स्था. गु. शाखा, पुणे ग्रामीण व नारायणगांव पोलीस स्टेशन असे संयुक्त कारवाई दरम्यान सी. सी.टि.व्ही फुटेजचे आधारे, तांत्रिक विश्लेषणा द्वारे सदर गुन्हा करते वेळी आरोपीतांनी वापरलेली स्वीप्ट गाडी नंबर निष्पन्न करून तिचा धुळे जिल्हयाचे हददीपर्यत शोध घेवून सदर गुन्हा उघडकीस आणला. व सदर गुन्हयातील आरोपी १) महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे (वय ३२ वर्षे रा.नांद्रा. ता.पाचोरा. जि. जळगांव, २) आकाश सुभाष निकम (वय २४ वर्षे रा. नादा. ता.पाचोरा. जि. जळगांव ३) अमोल सुरेश चव्हाण (वय २८ वर्षे रा. सामनेर. ता.पाचोरा. जि. जळगांव) यांना ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणुन सदर आरोपींकडुन चोरी केलेल्या मालापैकी पाच तोळे सोने व तीन घडयाळे असा एकुण २,९७,५०० /- रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर रविंद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली स्वा. गु.शा. पुणे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, प्रभारी अधिकारी नारायणगांव सहा. पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे. पोलीस उपनिरीक्षक सावंत, पो. हवा. दिपक साबळे, पो.ना. संदिप वारे, पो.ना. मंगेश लोखंडे, पो.ना. मोमिन, पो. कॉ. अवि वैदय, पो.कॉ. गोविंद केंन्द्रे, पो. कॉ. अक्षय नवले, पो. कॉ. महेश काठमोरे, पो. कॉ. शैलेश वाघमारे, पो. कॉ. कोतकर, पो. कॉ. ढेबरे, पोलीस मित्र नेहरकर यांनी केलेली असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे हे करित आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे