आळे खिंडीत मोटार सायकल स्वाराला लुटणाऱ्या तिन आरोपींना एलसीबी ने केले जेरबंद

1 min read

आळेफाटा दि.२९:- पाऊस आल्याने आळे (ता.जुन्नर) खिंडीत थांबलेल्या मोटार सायकल स्वाराला लुटणाऱ्या तिन संशयित आरोपींना एलसीबी ने केले जेरबंद केले असून आळेफाटा पोलीस स्टेशनकडील जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.१९ जुलै २०२३ रोजी रात्री २१:०० वा.चे सुमारास फिर्यादी सचिन रमेश सानप, रा. रूम नं.७०६, फेज १ विस्पलिंग सोसायटी, बाणेर, पुणे हे (मौजे संतवाडी, ता जुन्नर, जि पुणे) गावच्या हद्दीत फाउंटन हॉटेलच्या समोरील नाशिक- पुणे हायवे रोडच्या आळेखिंड मध्ये रस्त्याचे कडेला थांबुन पाऊस आल्याने आपला मोबाईल पॅन्टच्या खिशामध्ये ठेवत असताना. फिर्यादीच्या शेजारी एक पांढरे रंगाची ओमनी कार येऊन त्यातील दोघेजण खाली उतरून त्यातील एकाने फिर्यादीचे पॅन्टचे खिशातील मोबाईल हा जबरदस्तीने काढून घेतला व त्यातील एक जण फिर्यादीची मोटरसायकल जबरदस्तीने ओढत असल्याने फिर्यादी हे आरडाओरड करत फाउंटन हॉटेलकडे गेल्याने ते दोघे ओमनी कार मध्ये बसून फिर्यादीचा मोबाईल घेऊन पुणे बाजूकडे निघून गेले बाबत. आळेफाटा पो.स्टे गु.र.नं ३७१/२०२३ भादवि ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.जबरी चोरी व गंभीर गुन्हे उघडकीस आणणेकामी अंकित गोयल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता. वरिष्ठ पो.नि. अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीन यांचे आदेशाने एलसीबी चे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना. तांत्रिक विश्लेषणाच्या व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा संशयित ईसम नामे १) प्रशांत अण्णासाहेब जाधव (वय २३ वर्षे, रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर) याने त्याचे साथीदारांसह केल्याची माहिती मिळाल्याने त्यास नारायणगाव परिसरातून ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता. सदरचा गुन्हा त्याने त्याचे अन्य साथीदार नामे सचिन पवार व शिवतेज नेहे दोन्ही (रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांचे मदतीने केल्याची कबुली दिल्याने संशयित आरोपी २) सचिन जयराम पवार, वय ३० वर्षे, रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि.अहमदनगर ३) शिवतेज चंद्रहर्ष नेहे वय २६ वर्षे,रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर यांना आळेफाटा येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता. संशयित आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला रियल मी कंपनीचा 7 प्रो मॉडेलचा मोबाईल फोन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली पांढरे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी नंबर एम एच १५, जीएफ ७२८८ ताब्यात घेण्यात आली आहे. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी आळेफाटा पोस्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.सदर कामगिरी अंकित गोयल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) मितेश घट्टे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उप निरीक्षक अभिजित सावंत,पो. हवा दिपक साबळे,पो. हवा.राजू मोमीन,पो.ना. संदीप वारे,पो.कॉ. अक्षय नवले,पो.कॉ. निलेश सुपेकर यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे