शिरूर मध्ये चोरटयांनी भरदिवसा गोळीबार करीत केली घरफोडी;६ लाखांचा ऐवज लुटला; एक गंभीर जखमी

1 min read

शिरूर दि.२७:- आलेगाव पागा (ता. शिरूर) परिसरातील मायंदर मळा येथे मंगळवारी (दि. २५) दुपारी तीन हत्यारबंद चोरट्यांनी तीन घरे फोडून ४ लाख ३२ हजार रूपयांचा सोन्याचे दागिने तर २ दोन लाख २५ हजार रूपयांचा ऐवज असा सुमारे ६ लाख ५७ हजार रूपयांचा ऐवज पळविला. यावेळी चोरट्यांनी घरमालकावर गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले.

प्रभाकर गुलाब जांभळकर (वय ६०), असे त्यांचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. या घटनेत जखमी प्रभाकर जांभळकर यांच्या घरातून २ लाख १८ हजार रुपयांचे सोने तसेच रोख १ लाख रूपये आणि काळुराम किसन वाघचौरे यांच्या बंद असलेल्या घरातून १ लाख ५६ हजार रूपयांचे सोने दरोडेखोरांनी लुटले.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर गुलाब ‘जांभळकर हे शेतात काम करण्यासाठी गेले होते. ते घराकडे येत असताना घराचा ‘दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, यावेळी चोरट्यांना जांभळकर यांनी प्रतिकार केल्याने त्यांनी पिस्तूलमधून जांभळकर यांच्यावर गोळीबार केला. गोळी जांभळकर यांच्या पोटाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

त्यांनी आरडाओरड केल्याने चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले. या घटनेत दोन युवक व एका युवतीचा समावेश आहे. दरम्यान माणिक गुलाब जांभळकर यांचे घर फोडून ५८ हजार ५०० रूपयांचे सोने, ऐवज व रोख १ लाख २५ हजार रुपये चोरीस गेले आहे. यात ६ लाख ५७ हजार रूपयांचा चोरट्यांनी ऐवज पळविला.

याची फिर्याद अलका जांभळकर यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली. घटनास्थळाला ग्रामीण पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, विभागीय अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक संजय जगताप, अविनाश शिळीमकर, एकनाथ पाटील, संदीप यादव, विक्रम जाधव, पोलीस जवान गोपीनाथ चव्हाण, शिवाजी बोधे यांनी भेट दिली. भरदिवसा ही लूटमार झाल्याने आलेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे