नळवने येथील कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेराया मंदिरात चोरीचा प्रयत्न;सायरन वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम
1 min readनळवणे दि.२०:- श्री क्षेत्र नळवणे (ता.जुन्नर) गडावरील येथील तमाम महाराष्ट्र चे कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेराया मंदिर आवारात प्रवेश केला.
बुधवार दि. १९ रोजी रात्री १२.२० मिनिटे नी तीन चोरट्यांनी मंदिराचा मूख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु देवस्थान ने अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसविली असल्याने त्यांनी दरवाजा ला हात लावताच मंदिराचा सायरन वाजला त्या मुळे ते ताबडतोब पळून गेले व त्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.
तिघे चोर मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले. ते गडावरून पळून आल्या नन्तर गुंड वस्ती वरील श्री रामेश्वर प्राचीन मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील दान पेटी फोडली व त्यामध्ये असलेली रक्कम घेऊन पळून गेले.
सदर घटना स्थळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे व त्यांचे सहकारी यांनी दोन्ही घटनास्थळी येऊन पहाणी केली. सीसीटीव्ही च्या फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत. तसेच देवस्थान ने या पुढे प्रत्येक आठवड्याला दानपेटी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी रात्री च्या वेळी सतर्क रहावे असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी केले आहे.