शासकीय, खासगी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी;नवीन आदेशानुसार उल्लंघन केल्यास २०० दंड
1 min readमुंबई दि.१२:- महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून आता खासगी कार्यालयात देखील तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसे आढळल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने हे आदेश जारी केले आहेत.नवीन आदेशानुसार खासगी कार्यालय व उपहारगृहांत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास २०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी ज्यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाची जागा, उपहारगृहे, शाळा व महाविद्यालये यांचा समावेश होतो. तेथे नागरिकांच्या संरक्षणासाठी सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य इतर उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ च्या कलम ४ नुसार खाण्यास किंवा धूम्रपान करण्यास प्रतिबंध आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.