हॉटेलमध्ये ऑर्डर दिल्यावर लवकर रोटी दिली नाही म्हणून जबर हाणामारी; एका वर गुन्हा दाखल

1 min read

नारायणगाव दि.६:- नारायणगाव (ता.जुन्नर) येथील गणपीर दरबार या हॉटेलमध्ये रोटी ची ऑर्डर दिल्यानंतर लवकर रोटी आणली नाही या कारणावरून हॉटेल वेटर व ग्राहक यांच्यात वाद होऊन हॉकी स्टिक व लाथाबुक्क्यांनी जबरी मारहाण केल्याची घटना नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.गणपीर दरबार या हॉटेलचा वेटर मल्हारी भाऊ फापाळे ( रा. बदगी, बेलापूर ता. अकोले जि. नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.या घटनेची फिर्याद गणेश जयवंत गाडेकर (वय ४४) राहणार वारूळवाडी यांनी दिली.

फिर्यादी व त्यांचे मित्र मंगळवार दि.४ चार रोजी रात्री जेवण करण्यासाठी गणपीर दरबार या हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी गणेश गाडेकर यांनी रोटीची ऑर्डर दिली. ती रोटी लवकर का आणली नाही असे म्हटल्यानंतर आरोपी मल्हारी फापाळे याने गाडेकर यांच्या डोक्यात, पोटात, पाठीवर, छातीवर हॉकी स्टिक ने व लाथा बुक्याने मारून त्यांना गंभीर जखमी केले.यावेळी त्यांच्यासोबत असलेले रोहिदास पांडुरंग घोलप यांना देखील हॉकी स्टिकने पाठीमागून मारून शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या कारणावरून काल दि.५ रोजी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दाते करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे