जर्शी गाय चोराला ओतूर पोलिसांनी २४ तासांत केली अटक

1 min read

ओतूर दि.२ : – बल्लाळवाडी येथील शेतक-याच्या चोरीस गेलेल्या जर्शी गायीचा शोध घेऊन ओतुर पोलिसांनी चोराला २४ तासांत अटक केली आहे. ओतूर पोलिसांनी या बाबत दिलेली माहिती अशी की, सुरेश मारुती गाडेकर, रा. बल्लाळवाडी (ता. जुन्नर) यांचे राहते घराचे जवळील जनावरांच्या गोठ्यातील ४० हजार रू. किंमतीची एक जर्शी गाय ही दि. २४ जुन रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याबाबत ची तक्रार सुरेश गाडेकर यांनी दि. १ जुलै रोजी ओतुर पोलीस स्टेशन येथे नोंदविली होती. फिर्यादी जबाबा वरून पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २८६ /२०२३ भा.दं.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्हयाचा तपास करत असता बल्लाळवाडी गावातील महेश वसंत पवार याने त्याचे टेम्पोमधुन सुरेश गाडेकर यांची गाय चोरून नेली असल्याची माहीती खबऱ्या मार्फत प्राप्त झाली. त्याप्रमाणे महेश पवार याचेकडे विचारपुस करता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली. असुन त्याप्रमाणे सुरेश गाडेकर यांची चोरीस गेलेली गाय ही गोळेगाव येथुन हस्तगत करणेत आली आहे.

त्याप्रमाणे मिळुन आलेली जर्शी गाय ही सुरेश मारुती गाडेकर यांचे ताब्यात देणेत आली. असुन महेश वसंत पवार, (वय ३२ वर्षे) रा बल्लाळवाडी, ता. जुन्नर जि. पुणे यास सदर गुन्हयाचे कामी अटक करणेत आले आहे.
सदरची कारवाई अंकित गोयल (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण), मितेश घट्टे (अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण), रवींद्र चौधर (उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग), यांचे मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. एस.व्ही. कांडगे, पो.हवा. /१८४७ एम. एस. पटारे, पो.हवा./२०६५ एन. बी. गोराणे, पो.ना. / २२५१ डी. डी. साबळे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे