आळेफाटा बस स्थानकात चोरी गेलेले २ तोळ्यांचे मंगळसूत्र पोलिसांनी केले हस्तगत; बसस्थानकात चोरी करणाऱ्या त्या दोघांना अटक

1 min read

आळेफाटा दि.२४ :-आळेफाटा (ता.जुन्नर) येथील बसस्थानकात दिवाळीत चोरी गेलेले २ तोळ्याचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र आळेफाटा पोलिसांनी फिर्यादीला परत केले.

या बाबत आळेफाटा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेली माहिती अशी की, अंजली तानाजी शेजवळ (वय 47 वर्षे) रा. आळे, ता.जुन्नर, जि.पुणे या दिवाळी सणानिमित्त आळेफाटा ते ओतूर असा एसटीबसने प्रवास करण्यासाठी एसटीबस मध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांचे गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले होते.

सदर बाबत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केले नंतर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक नलावडे यांचे सुचणे प्रमाणे स पो नि सुनील बडगुजर, पो हवा गायकवाड/९५०, पो हवा गायकवाड/१८६८, पो ना पारखे, पो अं माळूंजे, पो अं तांगडकर, पो अं अरगडे, म पो अं फटांगरे यांचे तपास पथकाने तपास करून

आरोपी 1) बबन आनंदा भोसले, 2) मंजू नितीन भोसले, दोन्ही रा.सारोळा कासार, ता./जि. अहमदनगर यांना सदर गुन्ह्याचे तपास कामी अटक केले. असता आरोपितानी गुन्ह्यातील फिर्यादी यांचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली देवून दोन तोळे वजनाची सोन्याची लगड काढून दिल्याने ती गुन्ह्याचे तपास कामी जप्त करणेत आली होती. दिनांक 18 रोजी फिर्यादी अंजली शेजवळ यांना दोन तोळे वजनाचे सोन्याची लगड किंमत रुपये १ लाख ही मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जुन्नर यांचे आदेशाने परत देण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे