भुसार मालाच्या व्यापाऱ्याच्या घरात दरोडा; दोघांचा मृत्यू ; एक जखमी

नगर दि.२३: नगर जिल्ह्यातील शेवगाव शहराच्या बाजारपेठेतील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा (वय 55) रा. मारवाड गल्ली, शेवगाव यांच्या घरावर आज शुक्रवारी दि.२४ पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकला. त्यामध्ये गोपीकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भाऊजाई पुष्पा हरिकिशन बलवा (वय 65) या दोघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर सुनीता गोपीकिशन बलदवा या जखमी झाल्या आहेत.
या दरोड्याच्या घटनेमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळई सहाय्याने वार केल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच नगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, परीक्षेतील आयपीएस अधिकारी बी रेड्डी, व शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. या घटनेमुळे आज शेवगावची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.सध्या पाऊस नसल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी सतर्क राहण गरजेचं आहे.चार दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील हिवरे मधे दरोडा टाकून २० लाख रुपयांचे दागिने चोरी जाऊन घरातील चौघांना गंभीर स्वरूपात मारहाण करण्यात आली होती.