ह्रदयद्रावक; तरुणीला वाचवायला गेलेल्या ५ जणांचा दुर्दैवी बुडून मृत्यू

1 min read

विशाखापट्टणम दि.२:- आंध्रप्रदेशात मधील कुर्नूल जिल्ह्यात तुंगभद्रा नदी किनारी थरार पहायला मिळाला. एका अल्पवयीन मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात पाच जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी जे घडंल ते पाहून सगळे शॉक झाले.31 मे रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. ही तरुणी नदीकाठावर पाय धूत होती. अचानक, पाण्याच्या जोरदार प्रवाहात तिचा पाय घसरला आणि ती वाहून जाऊ लागली. तरुणीला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी आरडा ओरडा सुरु केला.पाच जणांनी नदीत उडी घेतली. पाण्याच्या जोरदार प्रवाहात हे सर्व तरुण अडकले. पाण्यात बुडून या तरुणांचा मृत्यू झाला. मात्र, ही तरुणी वाचली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नदीत बुडून या सर्वांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती जवळच्याच गावांचे रहिवासी होते. बचाव पथके त्यांचा शोध घेत आहेत. मंत्रालयम परिसरातून वाहणाऱ्या तुंगभद्रा नदीच्या काठावर अनेक लोक जमले होते. याचवेळी एक अल्पवयीन मुलगी नदीकाठावर पाय धूत होती. तिचा तोल गेला आणि ती घसरून नदीत पडली. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने तिला वाहून नेले.या मुलीला वाचवण्यासाठी एकापाठोपाठ 5 जणांनी नदीत उड्या घेतल्या.हा संपूर्ण थरार पाहून घटनास्थळी घबराहट पसरली. सर्वात आधी, मुलीला वाचवण्यासाठी एक जण नदीत उतरला. मग दुसरा, तिसरा असे 5 जण उतरले. अखेरीस, मुलीला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, नदीच्या जोरदार प्रवाहात हे 5 जण बुडाले. नदीच्या खोल पाण्यात आणि प्रवाहात हे पाचही जण अडकले. नदीत 5 जण बुडाल्याचे वृत्त समजताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे. पाचही मृतदेह लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफचे डायव्हिंग पथक नदीत शोध मोहिम राबवत आहे. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे मृतदेह बाहेर काढणे कठीण होत आहे. आजूबाजूच्या गावांतील लोक मोठ्या संख्येने नदीकाठी जमा झाले. नदीत बुडालेल्या पाचही जणांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबाचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!