दीपक सोनवणे व आण्णा मटाले यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान
1 min read
पुणे दि.२४:- अजिंक्य सोशल फाउंडेशन पुणे च्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी माजी अध्यक्ष तसेच दिपज्योत मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक सोनवणे
व प्रा. प्रतिभा सोनवणे यांना तसेच अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड माजी अध्यक्ष आण्णा मटाले व मोनिका मटाले
‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ आज वाकड येथील स्व. लक्ष्मणभाऊ जगताप सभागृह कावेरी नगर येथे संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज व वृक्षदायी संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करत देहू ते पंढरपूर पालखीमार्गावर ९५७६ वृक्षांची लागवड करणारे ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते व उपस्थित राजेंद्र मोरे,
डॉ.अशोक सोनवणे,ॲड विनायक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व महावीर एज्युकेशन सोसायटीचे व रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया, अजिंक्य सोशल फाउंडेशन अध्यक्ष सचिन पवार, सचिव बाळासाहेब राठोड, यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
