पांडुरंग पवार यांना ‘आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार’
1 min read
जुन्नर दि.२२:- पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार रा.निमगाव सावा (ता.जुन्नर) यांना जिल्हा परिषद पुणे चे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली चे माजी सभापती स्वर्गीय रामभाऊ बराटे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार’ नुकताच प्राप्त झाला आहे.
सोमवार दि.२५ रोजी दुपारी ३ वाजता या पुरस्काराचे वितरण राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे, महाराष्ट्र राज्याचे विधानसभाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक चे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे. सदर पुरस्काराची वितरण हॉटेल डेक्कन रॉयल, सहावा मजला, साई सर्विस जवळ, सौभद्र हॉटेल समोर, डेक्कन पुणे येथे केले जाणार आहे. विकासाचा महामेरू म्हणून ओळखले जाणारे पांडुरंग पवार यांनी गेल्या ३५ वर्षाच्या कार्य काळामध्ये कोट्यावधी
रुपयांची विकास कामे जिल्हा परिषद गटात केली आहेत. तसेच पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी जिल्ह्यामध्ये विविध कामे केली. यांच्या कामाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना दिला गेला असल्याची चर्चा आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जुन्नर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
