राज्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी, ‘या’ तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा होणार

1 min read

पुणे दि.२०:-राज्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे, तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान मिळणार आहे. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीसाठी लाभार्थी शेतकर्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. असे कृषीमंत्री दत्ता भरणे म्हणाले आहेत. राज्यात शेतकरी नेत्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. राज्यातील सरकारकडून 30 जून 2026 पर्यंत पात्र शेतकऱी बांधवांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.मात्र आता विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणार्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीची प्रक्रिया थांबणार का? अशी चर्चा सुरू होती. यावर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी ही माहिती दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीचा निकाल 22 जून 2026 रोजी लागणार आहे., संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जून 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.यामुळे आचारसंहितेच्या काळात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अडचणीत येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या संदर्भात कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, शेतकरी कर्जमाफीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. याबाबत सरकार योग्य निर्णय घेणार आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल.30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या योजनेत केवळ थकबाकीदार शेतकरीच नव्हे, तर वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकर्यांनाही दिलासा मिळणार आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होत आहे.या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार मतदान करत नाहीत.स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावतात. यामुळे आचारसंहितेचा कर्जमाफीवर नेमका किती परिणाम होईल? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता राज्य सरकार निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा निर्णय कशा पद्धतीने राबवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!